केज प्रतिनिधी

सध्या जिल्हा परिषद व पंचायत समितीचे बिगुल वाजणार आशातच नांदुर घाट जिल्हा परिषद सर्कल मध्ये गिंताजलीताई खाडे यांनी सर्कल पिंजुन काढले आहे , नांदुर घाट जिल्हा परिषद मधील मातब्बर नेते मंडळींनी धसका घेतला असल्याचे बोलले जात आहे,जनतेच्या हिताकरिता व जनतेच्या आग्रहास्तव आता नांदुर घाट जिल्हा परिषदेचा उमेदवार म्हणून प्रा. गीतांजली ताई लखन खाडे हे उच्चशिक्षित उमेदवार मिळणार आहे याची चर्चा आता जोरात सुरू आहे
सुशिक्षित बेरोजगारांसाठी काम करणे गावच्या हितासाठी काम करणे इतकच नव्हे तर गावामध्ये ग्रामीण रुग्णालय याची उभारणी करणे किंवा नांदूर घाटीतील चोरीचे प्रमाण वाढत असल्याने या ठिकाणी एक चौकी असणे गरजेचे आहे याचे देखील नियोजन आता गीतांजली ताई यांच्या विचारातून व यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी दिलेली माहिती समोर आले आहे सुशिक्षित बेरोजगारांकरिता टेक्निकल कॉलेजची उभारणी किंवा सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देता येईल अशी एखादी संस्था उभा करून त्यातून रोजगार उपलब्ध व्हावा याकरिताही प्रयत्न केले जाणार असल्याचे बोलले जाते त्याचबरोबर नांदूर घाट येथील वाढत्या चोरीचे प्रमाण पाहता त्या ठिकाणी एखादी पोलीस चौकी देखील उभा करण्याचे त्यांच्याकडून बोलले गेले आहे तर आरोग्याच्या बाबतीत बोलत असताना त्यांच्या सांगितले की कमीत कमी १०० बेडच का होईना परंतु नांदूर घाट या परिसरामध्ये ग्रामीण रुग्णालयाची उभारणी करण्यासाठी प्रयत्न करणार. शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत या प्रश्नांना वाचक फोडण्यासाठी व गावकऱ्यांना समस्यांच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी आता नागरिकांतून हा उच्चशिक्षित उमेदवार उभा रहावा आसेही बोलले जात आहे,तेव्हा आता या उच्चशिक्षित उमेदवाराची चर्चा जोरात रंगू लागल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत आहे, बड्या नेत्यांनी सुध्दा या उमेदवारांचा धसका घेतलाय आशी चर्चा सध्या नांदुर घाट जिल्हा परिषद सर्कल मध्ये रंगुलागली आहे

संपादक दशरथ चवरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *