कनेक्टिव्हिटी’ सह संकेतस्थळ वारंवार बंद होत असल्याने मनस्ताप

केज । प्रतिनिधी

राज्यात मोठा गाजावाजा करीत सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेतील लाभार्थ्यांना आता कात्री लावताना ई-केवायसी’ करण्याची अट शासनाने टाकली आहे. मात्र अधिकृत संकेतस्थळावर वारंवार तांत्रिक अडचण येत आहे. कनेक्टिव्ही, लिंक ओपन न होणे आदी अडचणी गेल्या अनेक दिवसांपासून येत आहेत. या अडचणींमुळे बहिणींना मनस्ताप सहन करावा लागत आहे. राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पारदर्शकपणे राबविण्यासाठी ई-केवायसी करणे बंधनकारक केले आहे.

या ई-केवायसीमुळे पात्र महिलांनाच योजनेचा लाभ मिळेल आणि गैरप्रकार थांबतील, परंतु लाडकी बहीण योजनेचे संकेतस्थळ ठप्प झाल्याचे अनेक ठिकाणी पाहायला मिळतेय. कारण केवायसी करताना एरर येत आहे.तर काही महिलांना ओटीपी येत नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींना

केवायसी करताना मोठ्या प्रमाणात
अडचणी येत आहेत. या अडचणी तत्काळ सोडविण्यासाठी अनेकांनी उपाययोजनांची मागणी केली आहे. लाभापासून कुणीही वंचित राहू नये
सरकारने ई-केवायसीसाठी दोन महिन्यांचा ठरावीक कालावधी दिला आहे. कागदपत्रे सादर करूनही केवळ तांत्रिक बिघाडामुळे नोंदणी होत नसल्याने महिलांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
या तांत्रिक अडचणींमुळे अनेक पात्र महिला योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या त्रासातून मुक्तता मिळावी, अशी अपेक्षा महिलांनी व्यक्त केली आहे.
लाभापासून कुणीही गोरगरीब आणि गरजू पात्र लाभार्थी वंचित राहू नये यासाठी शासन व संबंधित विभागाने तातडीने दखल घेऊन ई-केवायसीची वेबसाइट सुरळीत कार्यरत करण्याची व्यवस्था करावी, अशी मागणीही करण्यात आली.

संपादक दशरथ चवरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *