केज/प्रतिनिधी
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित दादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या केज तालुका उपाध्यक्षपदी प्रितम खरात यांची निवड करण्यात आली आहे. सामाजिक, राजकीय बांधिलकी जोपासणारे मनमिळाऊ सर्वांना सोबत घेत चालणारे प्रितम खरात यांची पक्षांचे प्रदेशाध्यक्ष खा,सुनिल तटकरे व मा.मंत्री आ. धनंजय मुंडे यांच्या सुचनेनुसार केज तालुका उपाध्यक्षपदी प्रितम खरात यांची निवड करण्यात आली. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या विचारानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आपली एकनिष्ठता तसेच आपल्या आचरण विचारद्वरे समाजात पद प्रतिष्ठेची जपवणुक व जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्यास आपण आग्रही रहाताल आसे बीड जिल्ह्याचे अध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांनी निवडी दरम्यान बोलताना सांगितले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या निवडीबद्दल केज तालुक्यात प्रितम खरात यांना शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
