सोनिजवळा सरपंचांचे वाढदिवसानिमित्त मित्र परिवाराच्या वतीने शुभेच्छांचा वर्षाव

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील सोनिजवळा येथील सरपंच गोविंद बापु ‌ससाणे यांच्या वाढदिवसानिमित्त मित्र परिवाराच्या वतीने शुभेच्छांचा वर्षाव,गावात ठिकठिकाणी जंगी स्वागत करण्यात आले.
या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक तथा ग्रामपंचायत सदस्य मिनाज पटेल यांनी गेल्या आडीच वर्षात गावत होत असलेल्या विकास कामाचा पाडा वाचुन शुभेच्छा दिल्या. या बरोबर गावातील तरुण व मित्र परीवाराने शुभेच्छाचा वर्षाव केला या मुळे सत्कारमूर्ती गोविंद बापु ‌ससाणे हे भाराऊन गेले सत्काराला उत्तर देताना गोविंद बापु ‌ससाणे म्हणाले की,हे ग्रामस्थ व मित्र परिवारांनी माझ्या वाढदिवसानिमित्त मला शुभेच्छा रुपी आशीर्वाद देऊन मला नवीन ऊर्जा दिली. मी यापुढे गावाचा विकास करुन दाखवेल तेंव्हाच हे हार,शाल, गुच्छ यांच्या ओझातुन उतराई होईल मी कायम नागरिकांची सेवा करण्यासाठी तत्पर राहील. कोणाचही काम आसेल तर मला अर्धा रात्री फोन करा मी उपलब्ध होईल, कोणाचही काम करण्यासाठी कुचराई पणा करणार नाही गाव माझ आणि मी गावचा आहे, मतभेद आसु शकतात मन भेद नाहीत , सर्वांना सोबत घेऊन गावचा विकास करायचा आहे या वेळे सरपंच गोविंद ससाणे यांनी मित्रपरिवार व ग्रामस्थांचे आभार मानले.

संपादक दशरथ चवरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *