.आमदार माझा नवसाचा, नमिताताई आमदार व्हावा म्हणून तिरुपतीला साकडं इच्छापूर्तीनंतर केस केले दान

केज! प्रतिनिधी

केज विधानसभा भाजपच्या आमदार नमिताई मुंदडा आमदार व्हावा म्हणून मुंदडा यांचे कट्टर समर्थक सुनिल घोळवे यांनी तिरुपती बालाजीला केस दान करण्याचा नवस बोलला होता

नवस किंवा प्रतिज्ञा करणे म्हणजे प्रमाणिकपणाचे वचन देणे,नवस बोलताना आपण आपल्या अडीअडचणी, इच्छा किंवा समस्या देवा समोर व्यक्त करत आसतो आणि त्या पुर्ण झाल्यावर मनात बोललेली इच्छा ईश्वर चरणी नतमस्तक होऊन वचनपूर्ती करत आसतोत, म्हणजे देवाला दिलेले वचन पूर्ण करतो , आसच एक नवस मुंदडा परीवाराचे कट्टर समर्थक सुनिल घोळवे यांनी
नमिताताई मुंदडा आमदार झाल्यावर तिरुपती बालाजीला जाऊन आपले केस दान करु आसा नवस बोलला होता परंतु काही आडचणी मुळे नवस फेडण्यासाठी वेळ लागला आणि चार जुन रोजी सहपरीवार तिरुपती बालाजी ला जाऊन आपला बोलले ला नवस फेडला त्यांनी बोलताना सांगितले की नवस फेडल्याने मन शांत आणि प्रसन्न झाले.नवस
फेडल्याने देवाची कृपा आपल्यावर राहते आणि समस्या दुर होतात आणि आपलेला सकारात्मक उर्जा मिळते,
केज विधानसभा निवडणुका कांही महिन्यापूर्वी पारपडल्या यात महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज साठे यांचा पराभव केला आणि विजय मिळवला आपला नेता परत एकदा आमदार व्हावा, याकरिता सुनिल घोळवे यांनी तिरुपती बालाजीला नवस बोलला होता, बोललेली आपली इच्छा पुर्ण झाली म्हणून सुनिल घोळवे यांनी तिरुपती बालाजीला जाऊन आपले केस दान करुन नवस फेडला आहे

संपादक दशरथ चवरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *