आता मांगवडगाव ग्रामपंचायत मधील भ्रष्टाचार उघडकीस आणणार : आशा शरद थोरात

केज । प्रतिनिधी

केज तालुक्यातील मौजे मांगवडगाव ग्रामपंचायतीत लाखो रुपयांचा घोटाळा झाला असून तो उघडकीस आणला जाईल असे ग्रामपंचायत सदस्या आशा शरद थोरात यांनी सांगितले.

मांगवडगाव ग्रामपंचायतीत विद्यमान सरपंच व ग्रामसेवक आर.के.चवरे हे ग्रामपंचायत सदस्यांना विचारत न घेता ठराव मंजूर करतात कसे? ठराव कुठल्या आधारावर मंजूर होतात याचे कुठलेही स्पष्टीकरण ना ग्रामसेवक देतात न सरपंच. १५ व्या वित्त आयोगाध्ये सामान खरेदीमध्ये मोठा

भ्रष्टाचार झाल्याचे निदर्शनास येत आहे. तसेच ग्रामपंचायतीत एकच रोड दोन ते तीन वेळेस मंजूर करण्यात येतो कसा ? दलित वस्तीतील सामान खरेदीमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे. घरपट्टीत, पाणी पट्टी यामध्ये देखील भ्रष्टाचार झालेला आहे. असे ग्रामपंचायत सदस्या आशा शरद थोरात यांनी सांगितले.

ग्रामसेवक‌ आर.के.चवरे आणि सरपंचांना

या संदर्भात कागदोपत्री विचारणा केल्यास अरेरावीची भाषा करतात. असा आरोप अशा थोरात यांनी केला आहे. मांगवडगाव येथील ग्रामपंचायत सदस्यांनी मिळून विद्यमान सरपंच व ग्रामसेवकांना अर्जाच्या माध्यमातून संबंधित भ्रष्टाचाराविषयी विचारणा केलेली आहे. जर येत्या ०९/०५/२०२६ रोजी याविषयीच्या माहितीची पूर्तता ग्रामसेवक आणि सरपंच यांचेकडून झाली नाही तर केज पंचायत समिती समोर अमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा आझाद क्रांती सेनेचे तालुका अध्यक्ष शरद थोरात यांनी दिलेला आहे.

संपादक दशरथ चवरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *