साबला नगरितील पूर्ण शेतशिवार एआरटी संस्थेने केला पाणीदार – सरपंच जनाबाई काकडे

केज – प्रतिनिधी

तालुक्यातील मौजे साबला येथील पूर्ण शेतशिवार पाणीदार करण्याचे काम ” ॲक्शन रूरल टेक्नॉलॉजी ” संस्था , यवतमाळ . या संस्थेने केला आहे . साबला ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ . जनाबाई काकडे यांच्या विनंतीला मान देऊन . ” एआरटी ” संस्थेचे संस्थापक / अध्यक्ष माननीय. सुहासराव धस . जलसंधारण तज्ञ माननीय पवनराव नखाते , प्रकल्प व्यवस्थापक माननीय वली तांबेळी प्रकल्प सहाय्यक श्रीमती ज्योती सांबरे , पोकलेन ऑपरेटर सोनुकुमार चंद्रवंशी , दिलीपकुमार चंद्रवंशी या सर्वांच्या नेतृत्वाखाली मौजे साबला नगरितील नदीच्या पात्राचे खोलीकरण आणि रुंदीकरण , त्यामध्ये पाणी अडवण्यासाठी , पाणी जमिनिमध्ये मुरवण्यासाठी कमीत कमी पाच पुट व जास्तीत जास्त सात पुट खोल असे बॉक्स बनवण्यात आले आहेत . त्या प्रत्येक बॉक्समध्ये वीस मिटर अंतरावर वीस पुट खोल असे बोरच्या मशिनने बोर घेतले आहेत . तसेच त्यामध्ये ठराविक अशा अंतरावर साखळी बंधारे बांधण्यात आले आहेत . साबला शेतशिवारात पडलेल्या पावसाचे पाणी साबला शेत शिवारातच राहिले पाहिजे . अशा प्रकारचे काम हे एआरटी या संस्थेने केले आहे . हे केलेले काम चांगल्या प्रकारे कसे राहील याची काळजी ही एआरटी संस्थेच्या सर्व कर्मचारी सहकारी कमिटीने केले आहे . या गावातील सर्व शेतकरी , शेतमजूर , प्राणी , पक्षी या सर्वांना याचा फायदा कसा होईल याचा विचार करून निर्णय घेतला आहे . आणि हे सर्व काम व्यवस्थित पणे केले आहे . या कामासाठी सरपंच सौ . जनाबाई नरहरी काकडे यांनीही स्वतः जातीने हजर राहुन लक्ष दिले आहे . काम चांगल्या प्रकारे झाले तर साबला नगरितील सर्व नागरिकांना याचा भविष्यात फायदा होईल याची काळजी त्यांनी स्वतः घेतली आहे . साबला ग्रामपंचायत चे सरपंच , उपसरपंच , सर्व सदस्य . तसेच सर्व गावकरी यांनी . या एआरटी संस्था , यवतमाळ . या संस्थेने केलेल्या कामाबद्दल या संस्थेचे खुप , खुप आभार मानले . आणि राहिलेल्या कामाबद्दल काम करण्यासाठी विनंती केली .

संपादक दशरथ चवरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *