सरपंचाने महिला वकीलास केली अमाणुष मारहाण दहा जना विरुद्ध गुन्हा दाखल

अंबाजोगाई ! प्रतिनिधी

अंबाजोगाई तालुक्यातील सनगाव येथील वकील महिलेला शेतात बोलाऊन दहा पैकी नऊ जनांकडून अमानुष मारहाण करण्यात आली आहे. या मारहाण प्रकरणी आता सरपंचासह दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अंबाजोगाई सत्र न्यायालयात वकिली करणाऱ्या ज्ञानेश्वरी अंजान या तरुणीला गावचा सरपंच आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी अमानुष मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी आता पोलिसांनी कारवाई करत मारहाण प्रकरणी सरपंचसह दहा जणांवर युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यामध्ये सरपंच अनंत रघुनाथ अंजान यांच्यासह सुधाकर रघुनाथ अंजान, राजकुमार ज्ञानोबा मुंडे, कृष्णा ज्ञानोबा मुंडे, ज्ञानोबा बब्रुवान रपकाळ, नवनाथ ज्ञानोबा जाधव, मृत्युंजय पांडुरंग अंजान, अंकुश बाबुराव अंजान, सुधीर राजाभाऊ मुंडे, नवनाथ दगडू मोरे या दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अंबाजोगाई तालुक्यात असलेल्या सनगाव येथील महिला वकील ज्ञानेश्वरी श्रीधर अंजान यांनी ध्वनी प्रदूषणामुळे मायग्रेनचा त्रास होत असल्याने लाऊड स्पीकर लावू नयेत व घरापुढे असलेल्या पिठाच्या गिरण्या काढाव्यात याबाबत तक्रारी केल्या होत्या. तसेच ज्ञानेश्वरी अंजान हिच्या आईची कोर्टात सुरू असलेली 307 ची केस काढून घेण्यामुळे वाद होता. कार्यकर्त्यांनी काठ्या व लोखंडी जेसीबी पाईपने रिंगण करुन ज्ञानेश्वरीला प्रचंड मारले. ही मारहाण इतकी भीषण होती की, ज्ञानेश्वरी अंजान यांच्या अंगातील रक्त साकळले असून त्यांच्या पाठीवर काळे-निळे वळ उमठले होते. ही घटना उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. या बाबत युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे हे तपास करीत आहेत

संपादक दशरथ चवरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *