केज शहरातील साई सुर्या डायग्नास्टीक सेंटरला शाटर्सर्किटने लागली आग
डॉ. सचिन राऊत यांच्या घरातील व क्लिनिक मधील सामान जळून खाक, जीवीत हानी टळली
केज ! प्रतिनिधी
केज शहरातील कानडी रोड येथील डॉ. सचिन राऊत यांच्या साईसुर्या डायग्नास्टीक सेंटर व घरातील किचन रुमला भीषण आग लागल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. घरातील फ्रिज भिंतीला खेटून ठेवल्यामुळे फ्रिज मधील गॅस गरम होऊन त्याचा शॉर्टसर्किट झाला. उष्णतेमुळे मोठी आग तयार झाली. या उष्णतेच्या ए.सी. कूलर संपर्कात आल्यामुळे त्यालाही भीषण आग लागली.
किचन मधील सर्व वस्तू जळाल्या आहेत. सदरील ठिकाणी वस्तूंचे फक्त अवशेष पाहायला मिळाले. किचनच्या बाजूलाच
असलेल्या डायग्नोस्टिक सेंटरच्या रूमलाही भीषण आग लागून सोनोग्राफीची मशीन व इतर सामग्री यामध्ये जळून खाक झाली. नगर पंचायत केज अग्निशामक दलाच्या सहकार्याने आग आटोक्यात आली. या आगीमुळे डॉ. सचिन राऊत यांचे अतोनात नुकसान झाले असले तरी यामध्ये कुठलीही जीवित हानी झालेली नाही. दरम्यान विजेचा लपंडाव होत असल्यामुळे विजेचा दाबही कमी जास्त होत आहे. महावितरण कंपनीने याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे नागरिकांतुन बोलले जात आहे.
–
