*पिसेगाव ते जानेगाव रस्त्याचे काम तात्काळ पुर्ण करा – ॲड निखिल बचुटे.*
केज ! प्रतिनिधी
केज तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग ५४८ पिसेगाव ते जानेगाव या रस्त्याचे काम गेले अनेक दिवस अतिशय धिम्या गतीने सुरू आहे त्यामुळे नागरिकांना मोठा ञास सहन करावा लागतोय,जर पावसाळा सुरू होईपर्यंत या रस्त्याचे काम पुर्ण नाही झाले तर पावसाळ्यात या रस्त्यावरून येणे जाणे सुद्धा करता येणार नाही व या रस्ता कामामुळे बससेवा सुद्धा बंद असुन शालेय विद्यार्थांची व जेष्ठ नागरिकांचीही येण्या जाण्याची गैरसोय होत आहे म्हणुन येत्या पावसाळा सुरू होण्यापुर्वी या रस्त्याचे काम पुर्ण करावे अशा सुचना संबधित रस्ता बनवणाऱ्या कंपनीला कराव्यात अशी मागणी ॲड निखिल बचुटे यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे यावेळी तहसीलदारांमार्फत बीडचे पालकमंञी अजितदादा पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
