संघर्ष पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष अनिल गलांडे यांची महाराष्ट्ररत्न पुरस्कारासाठी निवड
केज ! प्रतिनिधी
केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील रहिवासी संघर्ष पत्रकार संघ केज चे संस्थापक अध्यक्ष व केज तालुका प्रतिनिधी दैनिक तरुण भारत, बीड जिल्हाध्यक्ष ग्रंथालय कर्मचारी संघटना यांची महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.
याविषयी सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील चिंचोली माळी येथील रहिवासी व दैनिक तरुण भारत चे तालुका प्रतिनिधी, जिल्हाध्यक्ष ग्रंथालय कर्मचारी संघटना बीड, तसेच अध्यक्ष श्री संस्कार इंग्लिश स्कूल चिंचोली माळी आणि संचालक श्री संस्कार कॉम्प्युटर एज्युकेशन चिंचोली माळी यांनी मागील पंधरा वर्षांपासून अविरत पत्रकारिता, सामाजिक क्षेत्रात व ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी दिलेले योगदान, तसेच शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरी बद्दल पुणे येथील साऊ ज्योती सोशल फाउंडेशनच्या वतीने दिला जाणारा ‘महाराष्ट्र रत्नगौरव पुरस्कार ” अनिल गलांडे यांना जाहीर झाला आहे. मागील 15 वर्षातील सामाजिक, ग्रंथालय, पत्रकारिता आणि शैक्षणिक क्षेत्रातील कार्याच्या योगदानाची दखल घेत यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याचे निवड समितीने जाहीर केले आहे. येत्या २३ मार्च रोजी पुणे येथे आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार अनिल गलांडे यांना प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्काराच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे स्वागत होत आहे.
