सोनिजवळा येथे प्रधानमंत्री आवास योजना दुसऱ्या टप्प्यातील घरकुल मंजुरी प्रमाणपत्रचे वाटप
केज! प्रतिनिधी
केज तालुक्यातील सोनिजवळा येथे प्रधानमंत्री आवास योजना दुसऱ्या टप्प्यातील 46 घरकुलाचे प्रमाणपत्रचे वाटप सरपंच गोविंद ससाणे, ग्रामपंचायत सदस्य तथा अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक मिनाज पठाण, पत्रकार दशरथ चवरे , सत्तार शेख, मर्कध्वज सुर्यवंशी ,यांच्या हस्ते सोनिजवळा ग्रामपंचायत कार्यालय येथे वाटप करण्यात आले
देशाचे पंतप्रधान मा नरेंद्र मोदी यांच्या महत्वकांक्षी प्रकल्प सामान्य बेघर कुटुंबीयांना नवीन घर हा संकल्प पुर्ण महाराष्ट्रतील 20 लाख निराधारांना एकाच वेळी नवीन घर देण्याचे स्वप्न पूर्ण होताना दिसत आहे लाभार्थींना पंतप्रधान आवास योजनेचा पहिला हप्ता त्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकासमंत्री जयदीप गोरे यांच्या उपस्थितीत बालेवाडी पुणे येथे पार पडला एकाच वेळी 10 लाख लाभार्थींना (डिबीटी) प्रणाली द्वारे त्यांच्या खात्यात टाकण्यात आले,अशा या प्रकारचा इतिहासात नोंद राहील असा कार्यक्रम हा पहिलाच महाराष्ट्रात घेण्यात आला ग्रामीण भागातील दुसऱ्या टप्प्याच्या या कार्यक्रमात उर्वरित 10 लाख लोकांना पण लवकरच निधी वितरित करण्यात येणार आहे तसेच जे लोक या यादीत नाहीत त्यांचे देखील पुनर्वसन लवकरात लवकर करण्यात येणार आहे असे पंतप्रधान कार्यालयाने माहिती दिली आहे
