राहुल गदळे यांचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले अभिनंदन

केज/प्रतिनिधी

भाजपाचे युवा नेते राहुल भैया गदळे यांचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी अभिनंदन केले आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, केज तालुक्यातील विडा जिल्हा परिषद सर्कल मधील दहिफळ वडमाऊली येथील भारतीय जनता पार्टीचे युवा नेते राहुल भैय्या गदळे यांनी भारतीय जनता पार्टीचे संघटन परवा मध्ये तब्बल १ हजार सदस्य नोंदणी करून भाजप पक्ष वाढविण्यासाठी सहभाग घेतल्याबद्दल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आमदार नमिताताई मुंदडा भाजपाचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा अक्षय भैया मुंदडा यांनी युवा नेते राहुल भैया गदळे यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.
बीड जिल्हा परिषद सर्कल मधील वडमाऊली दहिफळ येथील भारतीय जनता पार्टीचे युवा नेते राहुल भैया गदळे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केजच्या आमदार नमिता ताई मुंदडा यांच्या आदेशानुसार ग्रामीण भागातील गावागावा मध्ये व वाडी वस्ती तांड्यावर जाऊन भाजप सदस्य नोंदणी करून तळागाळातील नागरिकांपर्यंत भाजप पक्षाचे विचार पोहचवण्याचे काम ग्रामीण भागातून राहुल गदळे यांनी एक हजार सदस्य नोंदणी करून भाजप पक्षाचे संघटन मजबूत व बळकट केले आहे.
याशिवाय महाराष्ट्राच्या विकासासाठी दूतही आपण जोडून घेतल्याबद्दल भाजपचे अध्यक्ष तथा महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी व आमदार नमिता ताई मुंदडा नंदकिशोर मुंदडा अक्षय मुंदडा यांनी युवा नेते राहुल भैया गदळे यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

संपादक दशरथ चवरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *