केज शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकाची दुर्दशा!
नगरपंचायतने तात्काळ श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे लक्ष द्यावे- शिवप्रेमीची मागणी
केज ! प्रतिनिधी
केज येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या कठड्याची मोठ्या वाहने चौकाला घासून जातात त्यामुळे चौकाची पडझड झालेली आहे. याकडे केज नगरपंचायतने तात्काळ लक्ष देण्याची मागणी शिवप्रेमी यांच्याकडून केली जात आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात सकाळच्या वेळी व संध्याकाळच्या वेळेस वाहनांची मोठी गर्दि असते याठिकाणी वाहनांच्या गर्दीमुळे चौकात मोठी कोंडी होत आहे. या चौकातील व चौकालगतच्या व्यावसायीकांच्या दुकाना समोर व दुकानांच्या आजु बाजूला उभ्या असलेल्या वाहनांच्या अडथळ्यामुळे वाहतुकीसाठी मोठाआडथळ निर्माण होत आहे. वाहनांची मोठी गर्दी व मोठी वाहने या चौकातून वळन घेताना अडचणी येतात. बीड, पुणे,मुंबई, श्री छत्रपती संभाजी नगर कडे जाणाऱ्या व येणाऱ्या बस देखील या ठिकाणी प्रवाशांना चढउतार करण्यासाठी थांबलेल्या असतात त्याचबरोबर सदर बस थांबण्यासाठी इतर वाहने उभे असल्यामुळे काही बस रिकाम्या जातात परंतु प्रवाशांना घेण्याकरिता उभा केल्या जात नसल्यामुळे प्रवाशांचे देखील हाल होत आहेत. सदर प्रकारामुळे श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या कठड्याला मोठी वाहने घासून जातात व जास्त लांबीचे वाहने जातात त्यामुळे चौकाचे नुकसान होत आहे. परंतु याकडे नगरपंचायत दुर्लक्ष करत आहे असा सवाल शिवप्रेमीतुन उपस्थित केला जात आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सकाळच्या वेळी व संध्याकाळच्या वेळी गर्दिच्या वेळेमध्ये वाहतूकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होत आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना रस्ता ओलांडता येत नाही व रस्त्याने चालता येत नाही. या चौकातील व्यावसायीकांच्या दुकानासमोर देखील काही छोटी मोठी वाहने अनेक वेळा उभी असतात त्यामुळे आणखी वाहतुकीस कोंडी निर्माण होते. श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या कठड्याला घासून मोठी वाहने जातात व चौकाची पडझड होत आहे परंतु नगरपंचायत याकडे लक्ष देत नाही. यामुळे शिवप्रेमी मधुन नाराजी व्यक्त केली जात आहे. या प्रश्नाकडे नगरपंचायतने गांभीर्यपूर्वक लक्ष द्यावे असे शिवप्रेमीतून बोलले जात आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक केव्हा मोकळा श्वास घेईल ?असा सवाल जनसामान्यातून व शिवप्रेमी मधुन उपस्थित केला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकाची झालेली पडझड ही तात्काळ दुरुस्त करावी व केज नगरपंचायतने श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकाचे सुशोभीकरण करण्यात यावे आसे शिवप्रेमी व जनसामान्यांतुन मागणी केली जात आहे.