सक्रीय पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी संतोष गालफाडे

केज ! प्रतिनिधी

 

केज तालूका सक्रिय पत्रकार संघाच्या कार्यकारणी निवड बैठकीत संघाच्या अध्यक्षपदी जेष्ठ पत्रकार संतोष गालफाडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
रविवारी  पत्रकार भवनामध्ये नूतन अध्यक्ष निवड बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्वानुमते संतोष गालफाडे यांची संघाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर नवनिर्वाचित अध्यक्षाकडे माजी अध्यक्ष अभय कुलकर्णी यांनी पदभार दिला.तसेच सक्रिय पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात दिल्या. यावेळी सक्रीय पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांची उपस्थिती होती.

संपादक दशरथ चवरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *