*रामकृष्ण बाल विद्या मंदिर चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे*
केज/प्रतिनिधी
केज शहरातील धारूर रोड परिसरात असलेल्या रामकृष्ण बाल विद्यामंदिर या शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन दि.29-12-2024 रविवार रोजी मोठ्या उत्साहात पार पडले.स्नेहसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त मुख्याध्यापिका सविता घुले,तर प्रमुख पाहुण्या म्हणून निवृत्त शिक्षणविस्तार अधिकारी रेखा शिंदे होत्या.मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दिप प्रज्वलनाने स्नेहसंमेलनाचा शुभारंभ करण्यात आला.
स्नेहसंमेलनात बाल कलाकर विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात एकांकीका,नाटिका,भारूड,देशभक्ती पर गीत व चित्रपटातील गीतांवर नृत्य सादर केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षा सविता घुले यांनी बाल विध्यार्थ्यांची नृत्य पाहून विद्यार्थ्यांचे कौतूक केले व शाळेचे अभिनंदन केले.प्रमुख पाहुण्या शिंदे मॅडम यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.स्नेहसंमेलनाचे प्रास्ताविक शाळेच्या संचालिका वर्षाराणी खंदारे यांनी केले.तर सुत्रसंचालन उदय कुंभकर्ण यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहशिक्षिका अश्विनी ठोंबरे,निकिता देशमुख,रोहन वेदपाठक,पवन चंदनशिव यांनी अथक परिश्रम घेतले.
