संतोष देशमुख यांना न्याय मिळे पर्यत लढा देणार – रमेशराव आडसकर
केज ! प्रतिनिधी
केज कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी केज व धारूर तालुक्यातील सर्व पक्षीय कार्यकर्ते व सामाजिक क्षेत्रातील समाजसेवक पत्रकार व्यापारी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत ज्येष्ठ नेते रमेशराव आडसकर यांनी
सर्व पक्षीय कार्यकर्त्यांना व सर्व समाजातील जनतेने लाखोंच्या संख्येने २८ डिसेंबर रोजी बीड या ठिकाणी संतोष देशमुख यांना न्याय मिळण्यासाठी मोर्चात लाखोच्या संख्येने सहभागी व्हावे असे आव्हान केले तसेच संतोष देशमुख खून प्रकरणाचा तपास जलद गतीने करून आरोपींना तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा करण्यात यावी तरच मयत संतोष देशमुख यांना न्याय मिळेल व जनतेचा न्याय व्यवस्थेवरील विश्वास दृढ होईल संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आजपर्यंत १७ दिवस झालेले आहेत तरी सुद्धा आरोपींना अटक झालेली नाही या प्रकरणाचा तपास खोलात जाऊन करण्यात यावा याची मागणी सर्वांच्यावतीने शासन दरबारी करणार आहे
दि.२८ डिसेंबर रोजी आरोपींच्या अटकेसाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मोर्चा काढण्यात येत आहे. या मोर्चात मी सहभागी होत असून जिल्ह्यातील नागरिकांनी ही आपली जबाबदारी आहे, या भावनेतून यावे, असे अवाहनही त्यांनी यावेळी केले
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अंकुश इंगळे युवराज दादा काळे ,सुनील गलांडे,भाई मोहन गुंड ,मौला सौदागर ,दिलीप गुळभिले ,विजयकुमार बन्साळी ,नसीर नेता इनामदार ,केज व धारूर शहरातील व्यापारी नागरिक सामाजिक कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते
