सत्तर वर्षीय अपंग शेतकरी खांद्यावर जू घेऊन कसतात शेती.
“तरुणाईला लाजवेल असे करतात शेती मध्ये कष्ट.
केज! प्रतिनिधी
केज तालुक्यातील लाडेगाव येथील सत्तर वर्षीय अपंग शेतकरी आजही तरुणाईला लाजवेल असे काम शेतामध्ये करून कसतात शेती.
केज तालुक्यातील लाडेगाव येथील सत्तर वर्षीय अपंग शेतकरी कल्याण अंबाड यांनी आपल्या शेतात बैल बारदाना नसताना देखील एक मंजुर लावुन बैलाचे जु खांद्यावर घेऊन ज्याप्रमाणे शेतकरी बैलाने जमिन तयार करुन घेतातत त्याच प्रमाणे दोघांनी जु खांद्यावर घेऊन कांदा लागवडीसाठी शेत जमिन तयार करुन वयाची सत्तरी पार झालेल्या कल्याण अंबाड हे शेतकरी बैल बारदाना नसल्याने शेती करण्याची आवड असल्याने प्रसंगी खांद्यावर जु घेऊन शेतात राबतात. आजच्या तरुणाईला, शेतात तन,मन, धन लाऊन प्रमाणिकपणे असे कष्ट केल्यावर भरपूर उत्पादन मिळाले व शेतीची सुधारणा होईल. शेतकऱ्यांच्या तरुण मुलांनी नौकरी च्या मागेन लागता पुर्ण वेळ शेतात काम केलेतर शेतीतुन उत्पन्न ही निघेल आणि घरातील वयोवृद्धांना आधार होईल आस आदर्श या वयात सुध्दा लाडेगाव येथील अपंग शेतकर्यांने आजच्या तरुणाई समोर आदर्श ठेवला आहे
चौकट
मला शेतीची आवड असल्याने बैल बारदाना नसताना सुद्धा मी आशी कामे करतो माझ्या शेतात आता सुध्दा अंबा बाग आहे.शेती मध्ये आसे कामे केले तर शेती नुकसानीत जात नाही उलट फायदाच देऊन जाते
अपंग शेतकरी
कल्याण अंबाड.
