*30 दिवसात येडेश्वरी युनिट नं.1*
*चे 2 लाख गाळप पूर्ण*
केज ! प्रतिनिधी
आनंदगांव(सा) येथील येडेश्वरी साखर कारखाना युनिट नं.1 ने दि. 16. नोव्हेंबर 2024 रोजी 11 व्या गळीत हंगामाची सुरुवात केली. आणि आज 16 डिसेंबर 2024 रोजी कारखान्याने दोन लाख टन गाळप करून ठरवलेल्या उद्दिष्टाकडे योग्य रीतीने वाटचाल चालू
आहे. कर्मचा-यांनी एकमेकांचे अभिनंदन करून आनंद साजरा केला.येडेश्वरीची प्रत्यक्ष गाळपाला सुरुवात 16 नाव्हेंबर 2024 झाली होती. आज रोजी 30 दिवसांमध्ये कारखान्याने 2 लाख टन गाळप करून साखरेचे उत्पादन 87हजार 250 क्विंटल घेतले. कारखाना प्रतिदिवस 7000 मे टन सरासरी प्रमाणे गाळप करीत आहे. तसेच कारखान्याच्या आसवानी प्रकल्पात इथेनॉल 19 लाख 37 हजार 374 लिटर व रेक्टीफाईड स्पिरीट 46 लाख 75 हजार 340 लिटर उत्पादन झाले असुन सहवीजनिर्मिती प्रकल्प सुद्धा चांगल्या पध्द्तीने सुरळीत सुरु असून दररोज ताशी १० मेगावॅट वीजनिर्मिती केली जाते. त्यात आजअखेर 99 लाख 97 हजार वीज युनिट निर्मिती झाली असून त्यापैकी 39 लाख 72 हजार 600 युनिट महावितरण कंपनीला विक्री केली. 11 वा गळीत यशस्वीरीत्या चालवला जात आहे. या यशाबद्दल कारखान्याचे सर्वेसर्वा बजरंग सोनवणे यांनी सर्व ऊस उत्पादक शेतकरी,संचालक ,सभासद, बिगर सभासद, तोडणी वाहतूक ठेकेदार व सर्व कारखान्याचे अधिकारी वर्ग व कर्मचारी यांचे २ लाख मे.टन गाळप केल्याबद्दल अभिनंदन केले. व तसेच पुढील गाळप उद्धिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्व कर्मचा -यांना प्रोत्साहित केले.
