*52 व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे बक्षीस वितरण व नवभारत साक्षरता उल्हास ॲप स्टॉलचे उद्घाटन संपन्न*
केज! प्रतिनिधी
गटशिक्षणाधिकारी कार्यालय केज ,पंचायत समिती केज ,व साने गुरुजी निवासी विद्यालय केज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 52 व्या केज तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन दिनांक 10 /12 /2024 रोजी साने गुरुजी निवासी विद्यालय केज येथे संपन्न झाले. दिनांक 10/12/ 2024व 11/ 12 /2024 या दोन दिवशी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात एकूण 80 प्रयोग नोंद झाले होते. या सर्व प्रयोगांची नोंदणी ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली होती . या कार्यक्रमाचे उद्घाटन गटशिक्षण अधिकारी लक्ष्मणजी बेडकर साहेब व बीड जिल्हा ऊसतोड कामगार विकास मंडळाचे अध्यक्ष ॲड उद्धवराव कराड साहेब यांच्या उपस्थितीत संपन्न झाले .सदर प्रयोगात नव संकल्पना व स्वयंनिर्मित प्रयोगांना प्राधान्य देण्यात आले होते .तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक,उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपले प्रयोग या दोन दिवसात सादर करून केज तालुक्यातील विद्यार्थ्यांना नव वैज्ञानिक बनण्याची संधी निर्माण करून दिली होती. यात अनेक उत्कृष्ट प्रयोग सादर करण्यात आले होते. नवनिर्मित व नव संकल्पना वाव देणारे स्वयंनिर्मित प्रयोग यात मांडण्यात आले होते.या प्रयोगाचे बक्षीस वितरण दिनांक 11 /12 /2024 रोजी शिक्षण अधिकारी प्राथमिक भगवानरावजी फुलारी जिल्हा परिषद बीड तसेच नियोजनचे शिक्षण अधिकारी संजय पंचगले साहेब केजचे गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकर साहेब,बीड जिल्हा ऊसतोड कामगार विकास मंडळ केजचे अध्यक्ष ॲड. उद्धवराव कराड साहेब यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. तसेच नवभारत साक्षरता अभियाना अंतर्गत उल्हास ॲपच्या माध्यमातून नवसाक्षरांना साक्षर बनवण्याचं काम करणारे प्रेरक यांनी केज तालुक्यातील 8 स्टॉल या ठिकाणी लावण्यात आले होते. वेगवेगळ्या माध्यमातून नवसाक्षरांना ऑनलाइन पद्धतीने कसे साक्षर केले याचे सादरीकरण प्रत्येक केंद्राच्या स्टॉलने अतिशय चांगल्या पद्धतीने सादरीकरण केले .हे स्टॉल सर्वांसाठी पाहण्यास खुले होते या स्टॉलची नियोजनचे शिक्षणाधिकारी पंचगले साहेब यांनी प्रत्यक्ष पाहणी करून प्रेरकांना प्रश्न विचारून त्यांनी केलेल्या कार्याचे कौतुक केले तसेच केज तालुक्यातील वरिष्ठ महाविद्यालयाच्या विज्ञान विषयाच्या प्राध्यापकांनी प्रदर्शनातील प्रयोगांचे परीक्षण करून प्रथम,द्वितीय,तृतीय क्रमांक काढले. क्रमांक काढताना कोणावरही अन्याय होऊ नये म्हणून यावर्षी प्रयोगाला कोड क्रमांक देण्यात आलेला होता कोड क्रमांका नुसार परीक्षकांनी अतिशय सुंदर अशा पद्धतीचे परीक्षण करून योग्य प्रयोगांना न्याय देण्याचे काम केले आहे. या बक्षीस समारंभ प्रसंगी ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी दत्ता चाटे यांनी वैज्ञानिकांचे कौतुक केले. तर नियोजनचे शिक्षणाधिकारी पंचगले साहेब यांनी नवभारत साक्षरता अभियाना अंतर्गत सर्व स्टॉलची पाहणी करून केज तालुका हा नेहमी शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर आहे .तसेच नव साक्षरतेचे शंभर टक्के यश या तालुक्याने संपादन केले आहे. केज तालुका जिओ टॅगिंग मध्ये अग्रेसर आहे असेही मत व्यक्त केले.तसेच नव बाल वैज्ञानिकांचे कौतुक करून अशा छोट्या छोट्या प्रयोगातून नव संकल्पना विकसित होत असतात व यातूनच नव वैज्ञानिक तयार होतात असे मत व्यक्त केले. तर प्राथमिक शिक्षणाधिकारी भगवान फुलारी साहेब यांनी विज्ञानाच्या शोधा बरोबरच आपली शाश्वत संपत्ती आपण जोपासली पाहिजे. हवा, पाणी,ऊन,नैसर्गिक संसाधने जपणे हे आपले कर्तव्य आहे. आपल्याला जे आवश्यक आहे त्याचा शोध आपण घेतला पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टींकडे आपल्या विद्यार्थ्यांचे लक्ष केंद्रित केले पाहिजे हे करत असतानाच नव संकल्पना शोधल्या पाहिजेत व बालवैज्ञानिकांच्या संकल्पनांना वाव दिला पाहिजे असे मत व्यक्त केले. तर अध्यक्ष स्थानावरून ॲड.कराड साहेब यांनी विज्ञानाबरोबरच व्यावसायिक अभ्यासक्रमालाही वाव दिला पाहिजे व्यवसायिक अभ्यासक्रम ही आता काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. त्याचबरोबर संपूर्ण केज तालुक्यासाठी विज्ञान प्रयोगशाळा निर्माण करण्याचे मत व्यक्त केले यावेळी लक्ष्मण बेडसकर साहेब,सुनील केंद्रे साहेब यांनी देखील आपले विचार व्यक्त केले. यात
इयत्ता 6 ते 8 उच्च प्राथमिक गट. जगदाळे सायली बाबासाहेब – साने गुरुजी निवासी विद्यालय, केज. *प्रथम*
पवार आदेश संतोष – हनुमान विद्यालय विडा. *द्वितीय*
देशमुख पियुषा जालिंदर – शारदा इंग्लिश स्कूल केज. *तृतीय*
दिव्यांग विद्यार्थी
ठोंबरे पूनम – साने गुरुजी निवासी विद्यालय केज *प्रथम*
इयत्ता 9 ते 12 माध्यमिक गट.
शिंदे संस्कृती योगेश – श्री होळेश्वर विद्यालय होळ *प्रथम*
पांचाळ संकेत मनोज – आदर्श माध्यमिक विद्यालय बनसारोळा *द्वितीय*
शेख हरीज बाबर – रामराव पाटील माध्यमिक विद्यालय केज *तृतीय*
प्राथमिक शिक्षक गट
श्रीमती सिरसट सुवर्णा लक्ष्मणराव – साने गुरुजी निवासी विद्यालय केज *प्रथम*
माध्यमिक शिक्षक गट
राठोड ए.डी. – होळेश्वर विद्यालय होळ *प्रथम*
प्रयोगशाळा सहाय्यक गट
केदार आकाश ज्ञानोबा – साने गुरुजी निवासी विद्यालय केज *प्रथम*
व सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करून विजयी स्पर्धकांचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी सर्व मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्री.गणेश वेदपाठक सर यांनी तर आभार प्रदर्शन केंद्रप्रमुख संजय चौरे सर यांनी मांनले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील सर्व केंद्रप्रमुख, कार्यालयीन कर्मचारी, साने गुरुजी निवासी विद्यालयातील कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. साने गुरुजी निवासी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विज्ञान गीत सादर करून उपस्थित त्यांची मने जिंकली.
सोबत :- फोटो
