केज ! प्रतिनीधी

केज तालुका स्तरीय 52 व्या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन येथील साने गुरुजी निवासी विद्यालय केज येथे पार पडले या वेळी डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम व सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमा पुजनाने व दिप प्रज्वलन करुन तसेच विज्ञान संकल्पनेतून पांढरे अक्षरे लाल रंगाचे करुन कार्यक्रमाचे उद्घाटन गटशिक्षणाधिकारी श्री. लक्ष्मण बेडसकर साहेब,यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बीड जिल्हा ऊसतोड कामगार विकास मंडळ केजचे अध्यक्ष श्री.उद्धवराव कराड हे उपस्थित होते. या उद्घाटन प्रसंगी बोलताना विज्ञान आणि तंत्रज्ञानाने माणूस विकसित झाला आहे अनेक गोष्टी बदलतात पण विज्ञान हे स्थाई आहे. या स्थाईभावाला नव्या संकल्पनेतून विकसित करण्याचे काम या बाल वैज्ञानिकांनी करावे असे मत व्यक्त केले यातुन नव संकल्पनान वाव मिळत असते यात नव वैज्ञानिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला पाहिजे. तर केज मध्ये एक मोठी सुसज्ज विज्ञान प्रयोग शाळा स्थापन व्हावी ती कोणाच्या मालकीची हे महत्वाचे नसुन त्यात तालुक्यातील सर्व शाळांना प्रयोग करता व दाखवता येतील तसेच एक मोठी दुर्बीण निर्माण करण्याचा माणस त्यांनी या प्रसंगी बोलताना केला.तसेच साने गुरूजी निवासी विद्यालय केज तालुक्यातील सर्व दृष्टीने मोडल स्कूल असल्याचे कौतुक केले तसेच सध्या व्यावसायिक अभ्यासक्रमाची गरज आहे. याला शाळांनी महत्व द्यावे असे मत व्यक्त केले.तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले उद्धवराव कराड यांनी विज्ञानाचे शोध आहेत फक्त या शोधाना नवीन संजीवनी देण्याच काम विद्यार्थ्यांनी व त्यांच्या मार्गदर्शकानी करावे. हे बाल वैज्ञानिक या प्रदर्शनातून आपली नव संकल्पना इतरांसमोर मांडतात व इतरांची पाहतात या दोन बाबी एकाच वेळी करताहेत म्हणजेच आपण शिकलो व इतरांना दाखविलो तर इतरांच शिकता आले आहोत प्रदर्शनातील मोडल बरोबरच त्या मागील सिद्धांत देखील तेवढाच महत्वाचा असतो असे मत व्यक्त केले. तसेच जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी सुनील केंद्रे, पठाण मॅडम, दरबारे मॅडम, यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले.तर व्यासपीठावर विद्यालयाच्या प्राचार्या डॉ. कविता गित्ते/कराड, केंद्र प्रमुख चवरे सर, मुंडे सर, मुळे सर, हे उपस्थित होते ‌यात मोठ्या संख्येने बाल वैज्ञानिक त्यांचे मार्गदर्शक शिक्षक उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश वेदपाठक यांनी केले तर आभार तरकसे यांनी मानले प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी गटशिक्षणाधिकारी कार्यालयाचे सर्व साधन व्यक्ती, कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

संपादक दशरथ चवरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *