सोनिजवळा येथील शेतकऱ्यांचे बोअरच्या मोटारीचे वायर गेले चोरीला

केज । प्रतिनिधी

केज तालुक्यातील सोनिजवळा येथे भुरट्या चोराचा सुळसुळाट झाला आहे. येथील शेतातील विहिरीवरील मोटारी तसेच बोअरवेलच्या वायर चोरीच्या घटनेमध्ये वाढ होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.केज तालुक्यातील सोनिजवळा येथे एकाच रात्री अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील बोर,‌विहीर, सोलारच्या मोटारीचे वायर चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रात्री शेतकरी उस्मान शेख यांच्या शेतातील विहीरीचे, व बोरचे दोन स्टार्टर, फ्युस पाचशे फुट वायर, पिंक्लर च्या आठ चिमण्या इत्यादी शेती उपयोगी साहित्या चोरट्यांनी चोरुन नेहले आहे, या अगोदर याच शेतकऱ्यांच्या शेतातील अनेक साहित्य चोरीला गेले होते या बरोबर सोनिजवळा येथील बर्याच शेतकऱ्यांच्या शेतातील वायर चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. सध्या दुष्काळ परीस्थिती निर्माण झालेली आहे यातच आशा चोरट्याने शेतातील साहित्यावर डल्ला मारने सुरू केले आहे. शेतकऱ्यांच्या नशीबी दुष्काळात तेरावा महिना म्हणण्याची वेळ आली आहे शेतकरी बांधवांनी सदरील चोरट्यांच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करावी .‌जेने करुन पोलिसांना भुरट्या चोराचा शोध घेणे सोपे जाईल .

संपादक दशरथ चवरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *