केज! प्रतिनिधी
केज तालुक्यातील सोनिजवळा येथील जिल्हा परिषद उर्दु प्राथमिक शाळा सोनिजवळा येथे फुड फेस्टीव्हलचे आयोजन करण्यात आले होते.फुड फेस्टीव्हलचे औचित्य साधून शाळेतील विद्यार्थ्यांनी त्यांच्या घरुन विविध प्रकारचे खाद्यपदार्थ तयार करुन आणले होते, वडापाव,इडली डोसा,साबु वडा,समोसा, पापड,भेळ,शरबत,आदी खाद्य पदार्थ ठेवण्यात आले होते,या खांद्यपदार्थांचा आनंद विद्यार्थी,पालक, शिक्षक,व स्थानिक नागरिकांनी घेतला,या उपक्रमाचे पालकांनी भरभरून कौतुक केले , या फुड फेस्टीव्हल कार्यक्रमातुन विद्यार्थींना खाद्य पदार्थांच्या विक्रीतून व्यवहाराचे धडे शिकवले, कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सलमा बाजी व सहशिक्षिका सिद्दीकी बाजी यांनी परीसृम घेतले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सत्तार शेख, प्रमुख पाहुणे ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष गोविंद ससाणे, अंबेजोगाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक तथा ग्रा प सदस्य मिनाज पटेल, झुंजार पत्रकार संघाचे अध्यक्ष दशरथ चवरे, भागवत कोकाटे, पांडुरंग ससाणे, ग्रा प सदस्य देवीदास जोगदंड,
बाबूराव गायकवाड, अरुण करपे, कल्याण ,ससाणे, ग्रा प सदस्य प्रताप वैरागे, विनोद महाजन,जमाल शेख, …
शाळेच्या मुख्याधिपिका , सह कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद उर्दु शाळेच्या वतीने करण्यात आले होते तर आभार प्रदर्शन सत्तार शेख यांनी केले
