*केज शहरातील महिलांनी लाभ घेण्याचे सुवर्णा शेटे यांचे आवाहन*
केज! प्रतिनिधी
केज शहरामध्ये मागील काही महिन्यांपासून कार्यरत असलेल्या गुरुकृपा योगा अकॅडमी कडून महिला,पुरुष व लहान मुलांसाठी एक महिन्याचे मोफत योगा डेमो क्लासेसचे आयोजन करण्यात आले आहे.दि/01 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2025 दरम्यान या क्लासचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे सकाळी 5.15 ते 6.30 यावेळेत भवानी मंदिर,धारुर रोड,केज येथे व सकाळी 11.00 ते 12.00 यावेळेत आवाड एज्युकेशनल अकॅडमी, कानडी रोड केज येथे या क्लासचे आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये महिला-पुरुषांचे विविध शारीरीक समस्या,लहान मुलां मधील स्थूलता याविषयी माहिती देवून योगासने करून घेतली जाणार आहेत.तरी जास्तीत जास्त महिला पुरुषांनी व लहान वयोगटातील मुलांनी या एक महिन्याच्या मोफत क्लासचा लाभ दोन्ही वेळे पैकी आपल्या सोयीच्या वेळे नुसार घ्यावा असे आवाहन संचालिका योगशिक्षिका सुवर्णा शेटे यांनी केले आहे.
