बीड! प्रतिनिधी

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तसेच विषेशतः जिल्हा परिषदांच्या निवडणुकींच्या तोंडावर कृषी खात्याकडून शेतकऱ्यांसाठी देशाबाहेर अभ्यास दौऱ्यासाठी आता १ लाखाऐवजी २ लाखाचे अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली आहे.

राज्यातील शेतकऱ्यांना अधुनिक शेतीाची माहिती मिळावी तसेच, जगातील सर्वोत्तम शेती तंत्रज्ञान आपल्या शेतात वापरावे यासाठी कृषी विभागामार्फत परदेशी अभ्यास दौऱ्याचे आयोजन केले जाते. २०१२ नंतरच्या काळात प्रवास, निवास आणि परकीय चलनातील दरवाढ लक्षात घेतली असता, रुपये १ लाख रक्कम हील कमी पडत होती, त्यामुळे शेतकऱ्यांना पुरेशी मदत मिळत नव्हती. त्यामुळे या योजनेचे अनुदान आता दुप्पट केल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. यामुळे परदेशी कृषी दौरा करण्यासाठी आता शेतकऱ्यांना १ लाख ऐवजी १ लाख रुपये मिळणार आहेत. हा निर्णय म्हणजेशेतीला अत्याधुनिक तंत्रज्ञानाशी जोडण्याचा प्रयत्न आहे. अशी प्रतिक्रिया कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या निर्णयामुळे आता देशाबाहेर अभ्यास दौऱ्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रवास खर्चाच्या ५० टक्के किंवा कमाल रुपये २ लाखांपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक गुणवत्तापूर्ण अनुभव घेता येईल, तसेच प्रगत देशांतील शेतीपद्धतींचा अभ्यास करून त्या आपल्या शेतीत राबवण्याची प्रेरणा मिळणार, अस कृषीमंत्री म्हणाले. कृषीमंत्री भरणे पुढे म्हणाले, ही योजना सन २००४-०५ पासून कृषी विभागामार्फत राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांना विदेशात जाऊन तेथील आधुनिक तंत्रज्ञान, शेतीतील यशस्वी मॉडेल्स आणि बाजारपेठीय पद्धतींचा अभ्यास करता यावा, यासाठी या निर्णयाची अंमलबजावणी कृषी आयुक्तालय, पुणेयांच्या माध्यमातून करण्यात येईल. योजनेअंतर्गत निवड प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी अर्जाची छाननी जिल्हा कृषी अधिकारी, राज्यस्तरीय समित्या आणि कृषी आयुक्त कार्यालयाच्या माध्यमातून केली जाईल.

संपादक दशरथ चवरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *