केज! प्रतिनिधी

केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील श्री संस्कार इंग्लिश स्कूल मध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त व दहिहंडी उत्सवा निमित्त मुलांचा बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला.
याविषयी सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील ग्रामीण भागात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या व इंग्रजी माध्यमाचे उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण देणाऱ्या श्री संस्कार एज्युकेशन ग्रुपच्या श्री संस्कार इंग्लिश स्कूल मध्ये मागे होवुन गेलेल्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व दहिहंडी उत्सवा निमित्त मुलांचा बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी सर्व प्रथम मान्यवरांच्या हस्ते रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, स्त्री शिक्षणाच्या शिल्पकार क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, विद्या देवता माता सरस्वती चे पुजन व दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर मा. रमेश भिसे साहेब, सचिव जनविकास सेवा भावी संस्था केज, संजीवनी राऊत, काकासाहेब कोल्हे सर यांनी श्री संस्कार एज्युकेशन ग्रुप च्या पुढील वाटचालीसाठी गौरवोद्गार काढून शुभेच्छा दिल्या. त्यानंतर श्री संस्कार इंग्लिश स्कूल च्या विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त भाषणे व श्री कृष्ण चरित्र गीते, गवळणी व देश भक्ती पर गीतांवर बहारदार नृत्य सादर केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. रमेश भिसे साहेब सचिव जनविकास सेवा भावी संस्था केज हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच सौ. रोहिणीताई सुनील देशमुख, कैलास पाटील सरपंच साळेगांव, रब्बानी सर, अध्यक्ष जिनीयस इंग्लिश स्कूल, ह.भ‌.प. आबा महाराज मेहरकर, काकासाहेब कोल्हे सर, संजीवनी राऊत, सुनील बापू देशमुख, ग्रामपंचायत सदस्य बालाजी राऊत, रामभाऊ गलांडे, शहाजी अप्पा गलांडे, अरुण काळे चेअरमन से. स.सो. चिंचोली माळी, रजनी देशमुख मॅडम, बापुराव तोंडे, ज्ञानेश्वर भांगे, पत्रकार ज्योतीराम सावंत, रामदास सपाटे, अमोल कापरे, अतुल देशमुख, श्री संस्कार इंग्लिश स्कूल चे अध्यक्ष अनिल गलांडे हे होते. या कार्यक्रमाला परिसरातील नागरिक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रिन्सीपल सीमा काळे, व त्यांच्या शिक्षक टिमने परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष अनिल गलांडे यांनी केले तर सूत्रसंचालन आरती आचार्य मॅडम व सीमा काळे मॅडम यांनी केले.

संपादक दशरथ चवरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *