पारधी समाजाची स्मशानभूमी हटण्याचा प्रयत्न
केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील जवळबन येथील गायरान जमिनी वर उभारण्यात येत असलेला सौर ऊर्जा प्रकल्प हा पारधी समाजाच्या मुळावर आला असून
आमच्या पूर्वजांच्या समाध्या आम्ही कदापी उध्वस्त करु देणार नाही, त्यासाठी आम्ही मरु पण आता मागे हटणार नाही असाही पवीत्रा आता पारधी समाज बांधवांनी घेतला आहे.
केज तालुक्यातील जवळबन शिवारातील गायरान जमिनीवर मागील अनेक वर्षांपासून पारधी समाजाचे वास्तव्य आहे. छोटेमोठे जवळपास पन्नास जण येथे वास्तव्यास राहतात. या ठिकाणी सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे. या यंत्रणेने त्यांची स्मशानभूमीची जागा देखील साफसफाई करण्यास सुरु केली आहे यामुळे पारधी समाज संतप्त झाला आहे. समाजाचा विरोध पाहुण आता या स्मशानभूमीची जागा सोडून ईतर कामे सुरू आहेत परंतु या ठिकाणी कायम स्वरुपी आमची स्मशानभूमीची जागा रहावी यासाठी आम्ही मागे हटणार नाही असी भूमिका त्यांनी घेतली आणि या भूमिकेला चंद्रकांत खरात यांनीही त्या ठिकाणी उपस्थित राहून पाठिंबा दिला आहे.
भीमशक्ती सामाजिक संघटनेचे मराठवाडा संघटक चंद्रकांत खरात सर यांनी या प्रश्नावर वेळप्रसंगी मोठं जन आंदोलन उभं करू असा इशारा शासन आणि प्रशासनाला दिला आहे.
