युसुफ वडगाव मंडळातील गावांच्या ग्रामस्थांचा शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील युसुफ वडगाव मंडळातील गावांसाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराज समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.सदरचे शिबिर हे जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आले. उपविभागीय अधिकारी व तहसीलदार राकेश गिड्डे यांच्या विशेष प्रयत्नांनी केज तालुक्यातील युसुफ वडगाव मंडळात समाधान शिबिर आयोजित केले होते. या शिबिराचे आयोजन मंडळ अधिकारी विकास हजारे , युसुफ वडगाव मंडळातील ग्राम महसुल अधिकारी खतीब, पुजा मॅडम, वाघमारे मॅडम,नागिले मॅडम, केंद्र मॅडम, सुर्यवंशी मॅडम,कवडे मॅडम,यांची विशेष उपस्थिती लाभली होती.
तसेच तहसील कार्यालयातील संजय गांधी विभाग, पुरवठा विभाग, सेतू कार्यालय व महसूल विभाग उपस्थित होते. तसेच युसुफ वडगाव मंडळातील सर्व गावांचे ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी युसुफ वडगाव यांच्या सहभागाने मेळाव्यास उपस्थित होते. यावेळी कळंब -अंबाजोगाई रोडवरील सुकळी येथील निसर्ग मंगल कार्यालय येथे सकाळी ११-०० वाजता शिबिरास सुरुवात झाली.
यामध्ये वृद्धापकाळ, विधवा, अपंग योजना, उत्पन्न दाखले, जात प्रमाणपत्र, आधार लिंक आदी विविध सेवांचा समावेश होता. या शिबिरास उत्तम प्रतिसाद दिला. यावेळी महसूल विभागाच्या अधिकार्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून योजनांची माहिती दिली.
शिबिरात विविध प्रकारचे दाखले यामध्ये उत्पन्नाचे दाखले, पी एम किसान, रेशनकार्ड,नाव कमी करणे,नाव वाढवणे, एपीएल,डीबीटी, जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, संजय गांधी निराधार योजना चे कामकाज करण्यात आले.
युसुफ वडगाव मंडळातील ग्रामस्थानी शिबिरास उत्स्फूर्तपणे उपस्थित राहून भरघोस प्रतिसाद दिला. गावातील मान्यवरांनी सदर कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सर्व विभागांचे व उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांचे विशेष आभार मानले. केज तालुक्यातील युसुफ वडगाव मंडळ येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर संपन्न झाले.यावेळी तालुक्यातील विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.यूसुफ वडगाव मंडल मधील प्रतिष्ठित नागरिक मा.बालासाहेब बोराडे, लामतूरे तात्या , गोविंद बापू ससाने, संतोष सोनवने, प्रितम खरात उपस्थित होते . कार्यक्रमाचे सौ.केंद्रे मैडम यांनी सूत्र संचालन केले व वाघमारे मैडम यांनी उपस्थित शेतकरी यांचे आभार मानले.
