युसुफ वडगाव जि प सर्कलमधे झुंजार नेतृत्व खरात गुरुजींच्या नावाची चर्चा
केज ! प्रतिनिधी
जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक रणसंग्राम सुरू झाला असून गण आणि गटाची रचना जाहीर होताच अनेकांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे त्यामध्ये युसुफ वडगाव जि प सर्कलमधे चळवळीतील झुंजार नेतृत्व म्हणून चंद्रकांत खरात गुरूजी यांच्या नावाचीही चर्चा होताना पाहायला मिळत आहे.
ग्रामीण भागातील मिनी मंत्रालय म्हणून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कडे पाहिले जाते. अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर आता अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार या निवडणुकांचा मुहूर्त साधला जात आहे. त्याच अनुषंगाने जिल्हा परिषद पंचायत समितीच्या गट आणि गणाची रचना देखील प्रशासकीय पातळीवर जाहीर झाली आहे आणि लवकरच संबंधित ठिकाणी आरक्षण देखील जाहीर होतील मात्र सर्कलची रचना जाहीर होताच इच्छुक आणि त्या भागातील काही कर्तबगार कार्यकर्त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. केज तालुक्यातील युसुफ वडगाव जि प सर्कलमधे दलित चळवळीतील एक झुंजार नेतृत्व म्हणून चंद्रकांत खरात गुरूजी यांच्या नावाची चर्चा होताना दिसते आहे. सारणी (आ) या गावचे भूमिपुत्र असलेले हे खरात गुरूजी गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक व राजकीय कार्यामध्ये सहभागी आहेत. केज शहरांमध्ये त्यांचा रोज संपर्क असतो. अनेकांच्या मदतीसाठी ते आपला वेळ देत असतात. विविध कार्यालयातील पब्लिकच्या विविध प्रश्नांवर ते नेहमीच आवाज उठवत आलेले आहेत. यामुळे आता युसुफ वडगाव जि प सर्कलमधे खरात गुरूजी यांच्या नावाची चर्चा होताना दिसत आहे.
