“अजून तर कोणीच ” भावी” इकडे फिरकेना.

केज!‌ प्रतिनिधी

केज तालुक्यातील सोनिजवळा पंचायत समिती साठी एखादा खमक्या पहीलवान गाठीभेटी घेताना अजून तरी दिसेना,
सध्या थोड्याच दिवसांत जिल्हा परिषद व पंचायत समिती च्या निवडणूका येऊ ठेपल्या आहेत, या निवडणुकी साठी जिल्हा परिषद सर्कल असेल किंवा पंचायत समिती सर्कल असेल ज्या त्या सर्कल साठी “भावी उमेद्वार” फिरत आहेत परंतु सोनिजवळा पंचायत समिती साठी एखादा “भावी” पुढे येऊन काही गोरगरीब,अपंग, वयोवृद्ध, निराधार, नागरीकांची दिपावली गोड करतील असं वाटल होतं,परंतु दिपावली झाली, लक्ष्मी पूजन झाले, पाडवा झाला, परंतु सोनिजवळा पंचायत समिती गण असणार्या गावात एकदा सुद्धा भावी साधे सुद्धा फिरकला नाही , स्वप्न तर बर्याच जणांना पडत आहेत पण प्रत्यक्षात भेटी गाटी साठी किंवा दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी एकही पट्ट्या आला नाही, भावी नी आस करुन स्वताच्या पायावर धोंडा पाडून घेऊ नये , काहीनी तर फक्त शूभेच्छाचे बॅनर गावात आणुन ठेवले, कधी गावात भेट नाही ना कधी हाल हवाल नाही.निवडणूक जवळ आली म्हणून फक्त दिपावली च्या शुभेच्छा देणारे बॅनर गावोगाव लागतात,व्वा रे “भावी” आशान कुठ जमत आसतय होय….!लोकांना भेटायला आल्यावर मग जनता पण लय हुशार हाय, ते पण म्हणतील आम्ही तुमचेच हावूत साहेब…..काळजी करण्याची काय गरज नाही,बघु कस तुम्ही पडत नाही त याची आम्ही पुरेपुर काळजी घेऊ, ते तोंडावर बोलतील, लोकं आता पहील्या सारखी राहीली नाहीत, नेतेच शब्दाला पक्के नाहीत तर जनता का राहील, कधी गाडी च्या काळ्या काचा खाली घेतल्या नाही, ते आता म्हणतात लयच आपली हवा हाय,आपले शिवाय पर्याय नाही तो भ्रम काढा आता नेत्यांपेक्षा जनता च सुजान आहे कोणाच्याही भुलथापांना बळी पडत नाही त्यामुळे जनतेची कामे करावी लागतात. सध्याची जनता एवढी दुधखुळी नाही, आज काल कोणीही गळ्यात रेडिओ अडकून फिरताना दिसत नाही, आपण समजता एवढी जनता नक्कीच नादान नाही कामापुरता राम राम, आणि काम करणारा रामराम मायबाप जनता ओळखून आहे हे आपण विसरून कसं जमेल, आपण मागील काळात लोकांच्या किती कामाला पडलात आणि पुढे काय करणार हे खेड्यातील जनता ओळखून आहे कामाचा कोण ? आणि कामा पुरता कोण ? वातावरण सध्या गरम होत असून याची पुरेपूर जाण जनतेला आहे असे जनतेतून बोलले जात आहे.

संपादक दशरथ चवरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *