राज्यातील विविध बाजारात सद्या कापूस, सोयाबीन, मका, ज्वारी, बाजरी, मूग, भुईमूग व सूर्यफूल या आठ शेतीपिकाच्या उत्पादीत महत्वाच्या पिकांना हमीभावापेक्षा कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचा उत्पादीत खर्च ही वसूल होत नसल्यामुळे शेतकरी आर्थिक संकट ओढावले जात आहे.त्यामुळे शेतकरी हा कर्जबाजारी होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे.
शेतमाल हमीभावाने खरेदीची आम्ही गॅरंटी देतो असे सतत केंद्र सरकार वेळोवेळी सांगत असले तरी परिस्थिती ही वेगळीच आहे,राज्यातील खुल्या बाजारात महत्वाच्या १२ शेतीपिकांपैकी आठ पिकांना हमीभावापेक्षा कमी भाव मिळत आहे.त्यात कापूस, सोयाबीन, मका, ज्वारी, बाजरी, मूग,भुईमूग व सूर्यफूल या पिकांचा समावेश असून केवळ तूर,तीळ,उडीद व भाताला हमीभावापेक्षा जास्त भाव मिळत आहे.राज्यात सोयाबीनला हमीभावापेक्षा प्रतिकिलोला आठ ते दहा रुपये भाव कमी मिळत आहे,तीच परिस्थिती इतर पिकांची असून हमीभावाने ठराविक पिकांची सरकारची काही केंद्रावर खरेदी सुरु असली तरी केंद्र सरकारही कमी प्रमाणात ही पिके खरेदी करत किचकट प्रकिया राबवत असल्यामुळे त्यातच शेतकऱ्यांचा जास्त वेळ खर्चिला जात असल्याने शेतकऱ्यांनी ह्या खरेदी केंद्राकडेच पाठ फिरविली आहे.
चौकट ;
“२०२४-२५ साठीचे सरकारने जाहीर केलेले हमीभाव व हमीभावापेक्षा कमी दर मिळणारा शेतमाल.”
(प्रती क्विंटलचे भाव रुपयांमध्ये.)
शेतमाल हमीभाव खुल्या बाजारातील भाव
कापूस ७५२१ ७००० ते ७१००
सोयाबीन ४८९२ ४०००
मका २२२५ २१००
मूग ८६८२ ६५००
ज्वारी ३३७१ २४००
बाजरी २६२५ २५००
भुईमूग ६७८३ ५८००
सूर्यफूल ८२८० ६०००
•हमीभावापेक्षा जास्त दर मिळणारा शेतमाल•
उडीद ७४०० ७५००
तूर ७५०० ८०००
पांढरे तीळ ९२६७ ११०००
काळे तीळ ९२६७ १५०००
प्रतिक्रिया ;
शासन शेतीपिकाच्या उत्पादीत मालाला भाव जाहीर करते,परंतु प्रत्यक्षात विक्रीतून शेतकऱ्याची आर्थिक फसवणूक होते. कारण सरकार चुकीच्या पद्धतीने खर्च गृहीत धरून उत्पादन खर्च काढते.त्यामुळे चुकीचे हमीभाव दिले जातात.हमीभाव पिकाच्या उत्पादन खर्चाएवढाही नाही.हमीभावही उत्पादीत मालाला बाजारात मिळत नाही.हमीभाव आणि प्रत्यक्षात विक्रीचे भाव यामध्ये दरवर्षी मोठी तफावत राहते.त्यामुळे खरे तर शेतकरी अडचणीत येत आहे.”